आताच धर्म कसा आठवला? हसन मियाँ; सोमय्या यांचा सवाल

आताच धर्म कसा आठवला? हसन मियाँ; सोमय्या यांचा सवाल

| Updated on: Jan 11, 2023 | 1:55 PM

सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मी कोल्हापूरला जात होतो. मी कारखान्यावर जात होतो. त्या दिवशी गणेश विसर्जन होतं. त्यावेळी मला गणेश विसर्जनला जाऊ दिलं नाही. पण आज महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आणण्यासाठीच भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखिल हा सेंट्रल एजन्सीचा गैरवापर होत असल्याचे म्हटलं. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे एका विशिष्ट समाजाला टार्गेट कलं जात आहे असं म्हणाले. त्यावर आता सोमय्या यांनी पलटवार केला आहे

सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मी कोल्हापूरला जात होतो. मी कारखान्यावर जात होतो. त्या दिवशी गणेश विसर्जन होतं. त्यावेळी मला गणेश विसर्जनला जाऊ दिलं नाही. पण आज महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला. तुम्हाला आता कसा धर्म आठवला असा प्रश्न केला आहे.

सोमय्या यांनी मी कोल्हापूरला जात होतो. तुमच्या कारखान्यावर जात होतो. त्या दिवशी गणेश विसर्जन होतं. त्यावेळी मला गणेश विसर्जनला जाऊ दिलं नाही. हसन मियाँला हिशोब द्यावाच लागेल. हसन मियाँला आता धर्म आठवतो. महालक्ष्मीचं दर्शन घेताना मी जात होतो तेव्हा धर्म नाही आठवला नाही का? गरीबांचे पैसे खाताना धर्म नाही आठवला का? असा सवालही त्यांनी केला.

Published on: Jan 11, 2023 01:55 PM