‘तडफडलेल्या माश्यासारखी उद्धव ठाकरे यांची अवस्था’, भाजप नेत्याचा जोरदार हल्लाबोल
VIDEO | 'उद्धव ठाकरे यांचे भावी पंतप्रधान असे बॅनर म्हणजे मोठा जोक', माजी मुख्यमंत्र्यांना कुणी डिवचलं?
मुंबई, 28 जुलै 2023 | ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उद्धव ठाकरे यांच्याकडून तिलांजली देण्यात आली. त्यामुळे आता त्यांच्या सोबत कुणी राहिलेलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत उद्धव ठाकरे गेले मात्र आता तेही सरकारसोबत आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची अवस्था पाण्यातून बाहेर काढलेल्या एका माश्यासारखी झालेली आहे आणि आता फक्त तडफड सुरू आहे.’, असे म्हणत ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर राज्यात अनेक ठिकणी समर्थकांकडून लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पुणे आणि मुंबई शहरातील बॅनरची चांगलीच चर्चा झाली. यावरही गिरीश महाजन यांनी खोचक टोला लगावला आहे.
Published on: Jul 28, 2023 02:26 PM