सुषमा अंधारेंच्या आरोपावर गिरीश महाजन थेट म्हणाले, ‘कोण सलीम कुत्ता-गित्ता? मी ओळखत नाही’

| Updated on: Dec 17, 2023 | 6:28 PM

सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. तर सुषमा अंधारे यांनी याच पार्टीत भाजप नेते गिरीश महाजन हजर असल्याचा दावा केला. यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केले. ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आरोप फेटाळत म्हणाले....

जळगाव, १७ डिसेंबर २०२३ : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. तर सुषमा अंधारे यांनी याच पार्टीत भाजप नेते गिरीश महाजन हजर असल्याचा दावा केला. यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, कोण सलीम कुत्ता हे मला माहित नाही. मात्र त्या पार्टीमध्ये बडगुजर हे डान्स करताना दिसत आहेत. त्याबद्दल चौकशी समिती नियुक्त करण्यात आले असून चौकशी सुरू आहे चौकशीत जे काय आहे ते समोर येईल. पुढे त्यांनी असेही म्हटले. नाशिकचे मोठे सर्व मौलाना लग्नात होते त्या सर्वांनी आम्हाला आग्रहाचे आमंत्रण दिलेलं होतं. या लग्नामध्ये समोरचे लोक जे आक्षेपार्ह होते ते आम्हाला माहिती नाही. पण ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांच्यावर मी हक्क भंग आणणार आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 17, 2023 06:28 PM
Manoj Jarange Patil UNCUT : ‘… त्या आधारावर मराठ्याला आरक्षण द्या, ते शब्द तुमचेत’, जरांगेंच्या मागणीपुढे सरकार झुकणार?
…की आता मातोश्री ३ बनवायचंय? मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल