केरळा तर लांबच, पुण्यातच घडली लव्ह जिहादची घटना? सुप्रिया सुळेंवर भाजप नेत्याची सडकून टीका
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. तसेच मंचर येथील त्या घटनेचा थेट लव्ह जिहादशी संबंध जोडला.
पुणे : द केरला स्टोरी चित्रपटामुळे लव्ह जिहाद हा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. असेच प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. तसेच मंचर येथील त्या घटनेचा थेट लव्ह जिहादशी संबंध जोडला. यावरून पडळकर यांनी निशाना साधताना, दहावीची परीक्षा संपली त्याच दिवशी मंचर येथील पीडित मुलीला मुस्लीम मुलाने फूस लावून पळवून नेले. हा मुलागा पीडित मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. तिच्यावर अत्याचार केल्याचे समजत आहे. मुलीला लॉक करून ठेवलं होतं. त्या मुलीला समजून सांगून घरी घेऊन आले. बुरखा घालून मुलगी त्यांच्या घरी होती. मुलीच्या अंगांवर सिगारेट चटके दिले होते, गैरप्रकार करायला लावत होते. हा लव्ह जिहाद नाही का? तर पवारांची पोरगी म्हणते लव्ह जिहाद माहिती नाही. त्याची व्याख्या माहिती नाही. त्यांनी या मुलीला भेटावे, असं म्हणत टीका केली आहे.