‘… मस्ती आलीय’, शरद पवार यांच्यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली
VIDEO | गोपीचंद पडळकर यांच्याकडून शरद पवार यांचा एकेरी उल्लेख, अरे तुरेची भाषा करत म्हणाले...
सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. यावेळीही त्यांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका करत शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केलाय. गोपीचंद पडळकर यांनी अरे तुरेची भाषा करत पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन पडळकर टीका केली. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा देखील माकड असा उल्लेख करत त्यांच्यावरही निशाणा साधला आहे. गेल्या वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी शरद पवारांनी मस्ती केली. यावर्षी पवार का नाही आलेय़. पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. बारा वर्षे केंद्रात मंत्री होते. मागं कधी होते मला माहिती नाही, गेल्या वर्षी त्यांना आपली चौन्डी गाव काढून घ्यायचे होती. त्यामुळे तुमच्या परिवर्तनाचे केंद्र असणारे चौन्डी जागृत ठेवली पाहिजे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ही टीका करताना पडळकर वारंवार पवार यांचा एकेरी उल्लेख करत होते.