सोमय्यांनी इकबाल चहल यांचे मातोश्रीशी जोडले संबंध, पाहा काय म्हणाले
चहल यांना आलेल्या ईडीच्या समन्ससंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी चहल यांनी कोणत्याही तपास यंत्रणांना आतापर्यंत सहकार्य केले नाही, असा दावा केला आहे.
मुंबई : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal )यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडीच्या या आदेशावर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची प्रतिक्रिया आली आहे. हिशाब तो देना पडेगा, असे वक्तव्य त्यांनी केले. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी 16 जानेवारीला चौकशीसाठी बोलवले आहे. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढणार आहे. चहल यांना आलेल्या ईडीच्या समन्ससंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी चहल यांनी कोणत्याही तपास यंत्रणांना आतापर्यंत सहकार्य केले नाही, असा दावा केला आहे. आता चहल यांना हिशोब द्यावे लागणार आहे. चहल हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे की मातोश्रीचे? असा सवाल सोमय्या यांनी टीव्ही ९ शी बोलतांना व्यक्त केला.
Published on: Jan 14, 2023 09:44 AM
Latest Videos