Video : किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने अर्ज फेटाळला

Video : किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने अर्ज फेटाळला

| Updated on: Apr 11, 2022 | 6:00 PM

भाजप नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, त्यांच्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता सोय्यांची अटक अटळ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सोमय्या दोन दिवसांपासून संपर्कात नाहीत. दोन तासांचा युक्तीवाद झाल्यानंतर सोमय्यांचा अकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आम्ही याविरोधात आता हायकोर्टात धाव घेणार आहे. आत्ताच या प्रकरणात […]

भाजप नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे, त्यांच्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणात अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता सोय्यांची अटक अटळ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सोमय्या दोन दिवसांपासून संपर्कात नाहीत. दोन तासांचा युक्तीवाद झाल्यानंतर सोमय्यांचा अकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. आम्ही याविरोधात आता हायकोर्टात धाव घेणार आहे. आत्ताच या प्रकरणात काही सांगता येणार नाही, अशी माहिती किरीट सोमय्यांच्या वकिलांनी दिली आहे. तसेच आज फक्त किरीट सोमय्या यांचा जामीन फेटाळला आहे. नील सोमय्यांच्या (Neel Somaiya) अटकपूर्व जामीनावर उद्या सुनवाणी होणार आहे. किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण मागितलं होतं. मात्र त्यांना कोणतेही संरक्षण मिळालं नाही. सोमय्यांनी जो पैसा गोळा केला त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलावर आहे.