‘बाळासाहेब ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट, तर उद्धव ठाकरे जनाब उर्दूसम्राट’
VIDEO | उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा, या सभेची जोरदार तयारी करताना उर्दू भाषेत बॅनरबाजी
मुंबई : मालाडमध्ये आयोजित मन की बात कार्यक्रमाला पोहोचलेले भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मालेगावातील उद्धव ठाकरे यांच्या सभेवर जोरदार निशाणा साधला आहे. कृपाशंकर सिंह म्हणाले की, उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाबासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत, मला वाटले होते की तेही हिंदूहृदयसम्राट असतील, पण आता जनाब उद्धव ठाकरे उर्दू सम्राट झाले आहेत, दरम्यान, उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी केली जात असून 1 लाखाहून अधिक नागरिक याठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ठाकरे यांच्या सभेला जास्तीत जास्त उपस्थिती असावी याकरता मुस्लिम बहुल भागात उर्दू भाषेत सभेची बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. यावर हल्लाबोल करत कृपाशंकर सिंह म्हणाले बाळासाहेब ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट होते पण उद्धव ठाकरे जनाब उर्दूसम्राट झाले आहेत.