Nawab Malik bail : ‘मलिकांना जामीन मिळाला यात कसला जल्लोष?’, भाजप नेत्याचा राष्ट्रवादीला खोचक सवाल

Nawab Malik bail : ‘मलिकांना जामीन मिळाला यात कसला जल्लोष?’, भाजप नेत्याचा राष्ट्रवादीला खोचक सवाल

| Updated on: Aug 12, 2023 | 8:22 AM

मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक जेलमध्ये होते. ते आता तब्बल 17 महिन्यांनंतर बाहेर येत आहेत. तर त्यांना वैद्यकीय कारणाने हा जामीन देण्यात आला आहे. तर यावर ईडीने कोणताही आक्षेप घेतला नाही.

चंद्रपूर, 12 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक जेलमध्ये होते. ते आता तब्बल 17 महिन्यांनंतर बाहेर येत आहेत. तर त्यांना वैद्यकीय कारणाने हा जामीन देण्यात आला आहे. तर यावर ईडीने कोणताही आक्षेप घेतला नाही. मलिक यांना डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी निगडीत मालमत्ता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली होती. तर आता त्यांची सुटका झाल्याने राष्ट्रवादीकडून फटाके फोडून जोरदार जल्लोष करण्यात आला. यावरून भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. तर मलिक यांना जमानत हा न्याय प्रक्रियेतील भाग आहे. त्यात जल्लोष कसला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर जमानत म्हणजे आरोपातून मुक्ती नव्हे असेही देखील मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 12, 2023 08:22 AM