राज ठाकरे यांच्या युतीच्या त्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा पलटवार, म्हणाला…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षबांधणी करण्यासाठी पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी भाजपशी युती करणार का या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी टोला लगावला होता.
पुणे | 26 जुलै 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी राज्यातील सत्ता नाट्यावरून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षबांधणी करण्यासाठी पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी भाजपशी युती करणार का या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी टोला लगावला होता. त्यांनी, फक्त भेट झाली म्हणजे युती होत नाही असा टोला लगावला आहे. तर हे यांना भेटले म्हणजे लगेच युती होते का असा सवाल देखील त्यांनी पत्रकारांना केला. त्यानंतर आता राज्यात अनेक चर्चा होताना दिसत आहेत. यावरूनच भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी, राज ठाकरे यांना युतीसाठी भाजपने कधी बोलावलचं नाही असं म्हटलं आहे. तर आम्ही काही घेण्याासाठी दरवाजे उघडे ठेवलेत का असा खोचक सवाल राज ठाकरे यांना केला आहे. ते येणार नाही हा आनंद आहे आणि ते आयुष्यभर येऊ नयेत अशी सदिच्छा ही असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.