लंडनमध्ये उद्धव ठाकरे इक्बाल मिर्चीसोबत जेवले? नितेश राणे यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Dec 11, 2023 | 6:17 PM

तुमचा मालक लंडनमध्ये जाऊन इक्बाल मिर्चीसोबत कांदे पोहे खात असताना संजय राऊत यांना चालतं, पण प्रफुल्ल पटेल यांच्यावर का आरोप करायचा? असा सवाल नितेश राणे यांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारत अप्रत्यक्षपणे केली सडकून टीका

नागपूर, ११ डिसेंबर २०२३ : ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय हे लंडनमध्ये इक्बाल मिर्चीला भेटले असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तुमचा मालक लंडनमध्ये जाऊन इक्बाल मिर्चीसोबत कांदे पोहे खात असताना संजय राऊत यांना चालत, पण प्रफुल्ल पटेल यांच्यावर का आरोप करायचा? असा सवाल नितेश राणे यांनी संजय राऊत यांना विचारत अप्रत्यक्षपणे सडकून टीका केली आहे. तर लंडनमध्ये इक्बाल मिर्ची जेव्हा राहत होता तेव्हा जेवले होते की नाही? या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी द्यावं, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी याबद्दल खरं सांगावं नाहीतर, त्यांचे फोटो समोर आणू, असे म्हणत नितेश राणे यांनी थेट इशाराच दिला आहे.

Published on: Dec 11, 2023 06:17 PM
सध्या पत्रांचा जमाना, ‘त्यांच्या’वर कारवाई होणार का? उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना थेट सवाल
…असा मुख्यमंत्री पहिल्यांदा बघितला, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल काय?