‘उद्धव ठाकरे यांनी स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणणे थांबवावं’; उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याचा घणाघात

‘उद्धव ठाकरे यांनी स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणणे थांबवावं’; उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्याचा घणाघात

| Updated on: Jul 25, 2023 | 1:28 PM

“आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!” या शीर्षकाखाली टिझरला लाँच करण्यात आला आहे. ठाकरे यांची ही मुलाखत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यावरून आता भाजपकसह शिंदे गटाकडून आता टीका होताना दिसत आहे.

मुंबई, 25 जुलै 2023 | माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत! “आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!” या शीर्षकाखाली टिझरला लाँच करण्यात आला आहे. ठाकरे यांची ही मुलाखत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यावरून आता भाजपकसह शिंदे गटाकडून आता टीका होताना दिसत आहे. तर ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला असून सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं असं म्हटलं आहे. तर भाजपवर देखील हल्लाबोल केला आहे. यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी, कोणा ऐऱ्या गैऱ्याला कुटुंबप्रमुख म्हणणं हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आहे. त्यामुळे ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. तसेच ठाकरे यांनी स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणणे थांबवावं. तर जेव्हा राज्य साभांळण्याची जबाबदारी मिळाली तेव्हा गळ्याला पट्टा लावून फक्त स्वतःचं कुटुंब सांभाळलं. तेव्हा त्यांनी महाराष्ट्राला काही सांभाळलं नाही असा घणाघात त्यांनी केला आहे.

Published on: Jul 25, 2023 01:28 PM