…की आता मातोश्री ३ बनवायचंय? मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरे यांना थेट सवाल

| Updated on: Dec 17, 2023 | 6:46 PM

उद्धव ठाकरेंनी शनिवारी अदानी विरोधात धारावी ते बीकेसीपर्यंत पायी मोर्चादेखील काढला. त्यांनी मोर्चानंतर भाजप आणि अदानींविरोधात टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी जोरदार हल्लाबोल केलाय

मुंबई, १७ डिसेंबर २०२३ : धारावी विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन गौतम अदानी आणि सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होत उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला आहे. उद्धव ठाकरेंनी शनिवारी अदानी विरोधात धारावी ते बीकेसीपर्यंत पायी मोर्चादेखील काढला. त्यांनी मोर्चानंतर भाजप आणि अदानींविरोधात टीका केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. ‘गौतम अदानी कालपर्यंत तुमचे प्रिय मित्र होते. आता तुम्ही त्यांचे एवढे विरोधक कसे बनले? उद्धव ठाकरे यांना अनेकदा अदानींकडून फायदा करुन घेतलाय. तर मग आता कोणत्या टीडीआरच्या माध्यमातून वसुली पाहिजे की मातोश्री 3 बनवायचं आहे?’ असा सवाल कंबोज यांनी केला.

Published on: Dec 17, 2023 06:46 PM
सुषमा अंधारेंच्या आरोपावर गिरीश महाजन थेट म्हणाले, ‘कोण सलीम कुत्ता-गित्ता? मी ओळखत नाही’
वर्ध्यानंतर भिवंडीतही निम्म्या खुर्च्या रिकाम्या अन् मंचावर रंगलं नाराजीनाट्य, नेमकं काय घडलं?