सामनाच्या अग्रलेखावरून राणे यांचा हल्लाबोल; ‘…तर राऊत 10 जनपथ आणि सिल्वर ओकचा आचारी’
पुतीन असो की मोदी, त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो. हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक वॅगनर मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे. पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक वॅगनर ग्रुप एकत्र आल्याचं म्हटलं होतं
मुंबई : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. यावेळी पुतीन असो की मोदी, त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो. हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक वॅगनर मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे. पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक वॅगनर ग्रुप एकत्र आल्याचं म्हटलं होतं. त्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी यावेळी राऊत यांनी आधी वॅगनर ग्रुप काय होता त्याचा इतिहास जाणून घ्या असं म्हटलं आहे. तर पाटण्यात सगळे गुंड एकत्र आलते का असा सवाल केला आहे. कारण वॅगनर ग्रुप हा गुंडांचा होता. तर वॅगनार आचारी होता. मग राऊत हा काय 10 जनपथ आणि सिल्वर ओकचा आचारी आहे की त्या प्रिकोजी सारखा घरफोड्या. तसही प्रिकोजी आणि राऊत यांच्यात साम्य आहे. कारण राऊत ही घरफोड्याच आहे. यालाही घरफोडण्याशिवाय काहीच माहित नाही असा टोली लगावला आहे.