मुख्यमंत्री शिंदेंचा एकेरी उल्लेख, भाजप नेत्याची जीभ घसरली; ‘एकनाथ शिंदे हा नालायक अन्…’

| Updated on: Sep 25, 2024 | 1:04 PM

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नंदुरबारमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षातून भाजपात आयात केलेल्या माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Follow us on

जो सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात निर्णय घेईल त्याला जमिनीत गाडल्या शिवाय शांत बसायचं नाही, असा आक्रमक पवित्राच पद्माकर वळवी यांनी घेतला आहे. तर आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही, राजीनामा देण्याची सरकारला फक्त धमकी द्या, असेही पद्माकर वळवी म्हणाले. आदिवासी आमदार खासदार यांनी राजीनामा देण्याची धमकी देण्याबरोबरच भाजप आणि शिवसेना पक्षाची उमेदवारी न करण्याचे आवाहनही पद्माकर वळवी यांनी यावेळी केले. तर सरकार निवडणुकीच्या उद्दिष्टाने धनगर समाजाला फसवण्याचं काम करत आहे. आदिवासींच्या हक्कासाठी आमदारांनी राजीनामा देऊ नये तर सरकार मधील तिन्ही पक्षाकडून उमेदवारी करू नये. आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा, काँग्रेस मधून नुकतेच भाजपात आलेल्या पद्माकर वळवी यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना पद्माकर वळवी यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.