पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा, ‘2024 विधानसभा आधी मी…’ वेगळा निर्णय घेणार?
भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या राज्यात शिव शक्ती परिक्रमा यात्रा काढत आहे. पंकजा मुंडे यांची यात्रा आज नाशिकमध्ये पोहोचली. या दरम्यान पंकजा मुंडे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी घोषणा केली.
नाशिक : 05 सप्टेंबर 2023 | शिवा आणि शक्तीने माझ्या डोक्यात घातले की लोकांचे दर्शन घे म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले आह्रे. मात्र, माझा इथ अनोखा सन्मान केला. मी कुठल्याही पदावर नाही असे असताना माझे मोठे स्वागत झाले. जेसीबीने फुले उधळली. माझी यात्रा सफल झाली. तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीही नाही. हे शक्ती प्रदर्शन नाही, असे प्रदर्शन करायला खूप मोठे ठेकेदार हाताला लागतात. तुमची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ही शिव शक्ती परिक्रमा आहे. मला कुठल्याही गोष्टीचा मोह नाही. मुंडेसाहेब नावाचा वृक्ष तयार झाला त्या सावलीखाली मला जगायचे आहे. दोन महिने मी माझ्याकडे लक्ष दिले, माझी काही कामे करून घेतली. आपल्या देशात जाती धर्मावर वाद सुरू आहेत. पण, मी माझ्या लोकात शांतपणे जगत आहे. तुमची मान खाली जाईल असे काही करणार नाही. 2024 विधानसभा आधी मी यात्रा काढणार आहे, अशी घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.