Video | ‘आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यायची…,’ काय म्हणाल्या पंकजा मुंडे

सिद्धेश्वर देवस्थान संस्थानाच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केले. मी अशी माणूस आहे की माझ्यावर रेड पडली तर 11 कोटी जमा करण्यासाठी माझे कार्यकर्ते लगेच एकत्र झाले. किती आशीवार्द आहेत माझ्यावर अशा भाषेत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Video | 'आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यायची...,' काय म्हणाल्या पंकजा मुंडे
| Updated on: Mar 09, 2024 | 6:01 PM

बीड | 9 मार्च 2024 : कोणतीही निवडणूक लागली की भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना तिकीट मिळणार का ? त्याचं राजकीय पुनर्वसन केले जाणार का असा सवाल केला जातो. पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा आपल्याकडे झालेल्या दुर्लक्षावर अनेकदा जाहीर सभांमध्ये टीका केली आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांत त्यांना तिकीट मिळणार का? असा सवाल निर्माण झाला आहे. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या कन्या पंकजा मुंडे यांच्या मागे गोपीनाथ मुंडे यांना मानणारा बीडमधील मोठा समुदाय उभा राहीला आहे. सिद्धेश्वर देवस्थान संस्थानाच्या हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे, आणि प्रीतम मुंडे यांनी उपस्थित राहुन भाषण केले. ‘आपण आता माजी झालेलो आहोत, त्यामुळे तुमच्यासाठी काही घोषणा करु शकत नाही अशी खंत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. आता जे आजी आहेत त्यांच्या आजी होण्यात माजी लोकांचाही थोडासा का होईना वाटा असतो. व्यासपीठावर सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी, असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईन, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Follow us
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.