Pankaja Munde | सध्याचे राजकारण तणावपूर्वक, टीव्ही लावला की तणाव वाढतो – पंकजा मुंडे
ओबीसीच्या राजकीय अरक्षणाविना निवडणूक झाली तरी अवघड होईल. माझी कोणाशीही चर्चा झाली नाही, निवडणुका आल्या की माझे नाव समोर येते, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
बीड : 26 मे 2014 मध्ये मुंडे साहेबांनी मोदी साहेबांच्या सोबत शपथविधी घेतला होता. मात्र तो सोहळा जास्त काळ टिकला नाही. प्रत्येक व्यक्तीचा चेसमा त्यांच्या संस्कृतीतुन दिसून येते. सरकारने सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घ्यावे. जुन्या पिढीतील अनेक लोक सध्या नाही राहिलेत. सध्याचे राजकारण तणावपूर्वक आहे. टीव्ही लावला की तणाव वाढतो. 3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. गोपिनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेश सरकारला जे जमले ते या सरकारला जमले नाही. वेळोवेळी सांगूनही इंप्रियल डाटा पाठविला नाही. ओबीसीच्या राजकीय अरक्षणाविना निवडणूक झाली तरी अवघड होईल. माझी कोणाशीही चर्चा झाली नाही, निवडणुका आल्या की माझे नाव समोर येते, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
Published on: May 27, 2022 10:10 PM
Latest Videos