“असीम सरोदे यांना उद्धव ठाकरेंनी महापालिका आणि विधानसभेचं तिकीट द्यावं”
शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावरील निकाल दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालावर भाष्य केले. यानंतर असीम सरोदे यांना उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक किंवा आमदारकीची तिकीट द्यावी, असा खोचक टोला भाजप नेत्यानं लगवला आहे.
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावरील निकाल दिला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालावर भाष्य केले. यावर भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी भाष्य करत पलटवार केला आहे. असीम सरोदे यांना उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक किंवा आमदारकीची तिकीट द्यावी, असा खोचक टोला त्यांनी लगवला आहे. तर एखाद्या न्यायालयात उच्च पदावर, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात वकिली करणाऱ्या अशा माणसाने अशा प्रकारे जनतेच्या दरबारात येऊन न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य करणं, प्रचारसभेत येऊन बोलणं हे असीम सरोदे सारख्या व्यक्तीला शोभत नाही. त्यांनी या गोष्टीचा विचार करावा, असे वक्तव्य करत प्रसाद लाड यांनी सल्ला दिला आहे. एखाद्या गोष्टीची आणि व्यक्तीची चीड असू शकते परंतु, भारतीय संविधानाची आणि भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराची, न्यायव्यवस्थेची चीड करणं हा वैयक्तिक चीड करण्याचा भाग आहे. अशा ज्येष्ठ वकिलांना ते शोभत नसल्याचेही लाड यांनी म्हटलंय.