‘ते काय महाविकास आघाडीचा इंडिया काय घडविणार?’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

‘ते काय महाविकास आघाडीचा इंडिया काय घडविणार?’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

| Updated on: Aug 06, 2023 | 1:04 PM

काँग्रेससह देशातील महत्वाच्या विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. ज्याचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व येईल असे बोलले जात आहे.

मुंबई, , 06 ऑगस्ट 2013 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. तर काँग्रेससह देशातील महत्वाच्या विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक ही मुंबईत होणार आहे. ज्याचे यजमानपद शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व येईल असे बोलले जात आहे. यावरून भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी घणाघाती टीका केलीय. त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना, जे स्वत:चा पक्ष सांभाळू शकले नाही ते इंडियाचं नेतृत्व काय करणार? असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भुमिकेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना, त्यांची भूमिका ही वेळ आल्यावर स्पष्ट होईल. मात्र ज्यांच्याकडे इंडियाचं नेतृत्व जाणार आहे. त्यांना स्वत:च्या पक्षाचे आमदार सांभाळता आले नाहीत ते काय आघाडी सांभाळणार अशी टीका केली आहे. याचदरम्यान आज बैठकिबाबत माहिती देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

Published on: Aug 06, 2023 01:04 PM