गोऱ्हे यांच्यावरील अविश्वास ठराव मागे घेण्याच्या हालचाली?; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. तर त्यांनी हे फक्त आपले पद वाचविण्यासाठी केल्याची देखील टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता ते खरचं आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी काही दिवसांपुर्वीच शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. तर त्यांनी हे फक्त आपले पद वाचविण्यासाठी केल्याची देखील टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता ते खरचं आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण गोऱ्हे यांच्यावर भाजपकडून त्यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना, जर कुणी आमच्यावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून आमच्यासोबत येत असेल तर त्यांच्यावर आम्ही अविश्वास कसा दाखवू असा सवाल केला आहे. तर पक्ष, संघटना सोडून मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यासोबत येणाऱ्यांचे आम्ही स्वागतच करतो असही दरेकर यांनी म्हटलं आहे.