‘जालन्यातील आंदोलनामागे षडयंत्र अन् राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न’, भाजप नेत्याचा घणाघात

| Updated on: Sep 02, 2023 | 9:38 PM

VIDEO | जालन्यात शुक्रवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटनेवर भाजप नेते प्रविण दरेकर यांचं भाष्य, म्हणाले, 'राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न'

मुंबई, २ सप्टेंबर २०२३ | जालन्यात शुक्रवारी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मराठा समाजाचं जे आंदोलन झालं, जो लाठीचार्ज झाला ती घटना निश्चित दुर्देवी आहे. लाठीचार्ज का झाला यावर राज्य सरकार नक्की चौकशी करुन कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या घटनेमध्ये पोलीस बांधव जखमी झाले यासह मराठा समाजाचे काही आंदोलक जखमी झालेत. मात्र झालेला लाठीचार्जचं समर्थन नाही. पण या आंदोलनामागे काही षडयंत्र आहे का? की कोणी राजकीय पोळी भाजत आहेत? असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित करत आरोप केला आहे. तर हे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना फडणवीस सरकारने आरक्षण दिले होते आणि त्यानंतर महाविकासआघाडीचं सरकार आल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Published on: Sep 02, 2023 09:38 PM
‘महिलेवर हात उगारणे ही महाराष्ट्राची संस्कृती…’ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा कडाडल्या
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? शरद पवार आणि उदयनराजे यांच्या भेटीनंतर आंदोलन घेणार मागे?