Mumbai | …तेव्हा शिवसेनेची अक्कल कुठे गेली होती? प्रवीण दरेकरांचा सवाल
राज्य सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालं असल्याची टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी केलीय. शिवसेना सोबत असूनही मुंबै बँके(Mumbai Bank)त राष्ट्रवादीनं आपला अध्यक्ष बँकेला दिला, त्यामुळे त्यावेळी शिवसेनेची अक्कल कुठे गेली होती, असा सवालही त्यांनी केलाय.
राज्य सरकारच्या अकलेचं दिवाळं निघालं असल्याची टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांनी केलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी नारायण राणें(Narayan Rane)वर टीका केली. त्यानंतर बँकेवर राणेंची सत्ता आली, त्यामुळे कोणाची अक्कल राहिली आणि कोणाची गेली हे समोर आलं, असं ते म्हणाले. तर शिवसेना सोबत असूनही मुंबै बँके(Mumbai Bank)त राष्ट्रवादीनं आपला अध्यक्ष बँकेला दिला, त्यामुळे त्यावेळी शिवसेनेची अक्कल कुठे गेली होती, असा सवालही त्यांनी केलाय.
Published on: Jan 15, 2022 04:43 PM
Latest Videos