Sudhir Mungantiwar | कोणतही खातं छोटं नाही आणि मोठं नाही : सुधीर मुनगंटीवार
राज्यातील सर्व 50 विभाग महत्त्वाचे आहेत. मात्र नोटा मोजताना श्वास बंद करून मोजला तर वनांचे महत्त्व समजेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर : राज्याच्या नवनियुक्त मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर झाले. त्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय ही खाती मिळाली. त्यावर प्रतिक्रिया देताना कोणतेही खातं छोटं- मोठं नाही. राज्यातील सर्व 50 विभाग महत्त्वाचे आहेत. मात्र नोटा मोजताना श्वास बंद करून मोजला तर वनांचे महत्त्व समजेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वसुंधरेचे शोषण रोखण्यासाठी मागील काळात आपण ग्रीन आर्मी उभारली होती त्याच माध्यमातून ‘ग्रीन महाराष्ट्र’ बनविण्याचा संकल्प पुढे नेऊ असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आपल्याकडे आलेल्या सांस्कृतिक खात्याच्या माध्यमातून राज्यातील पराक्रमाचा इतिहास नव्या पिढीच्या समोर ठेवला जाईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Published on: Aug 14, 2022 09:02 PM
Latest Videos