‘आपण पंतप्रधान मोदी यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, हे सांगण्यासाठी ते गेले असतील’; भाजप नेत्याची प्रतिक्रिया

‘आपण पंतप्रधान मोदी यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, हे सांगण्यासाठी ते गेले असतील’; भाजप नेत्याची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 13, 2023 | 7:45 AM

यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांची अशी भेट घेतल्याने तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच घडवून आणली. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याने आता चर्चांना उत आला आहे.

चंद्रपूर, 13 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल पुण्यात गुप्त बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांची अशी भेट घेतल्याने तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच घडवून आणली. तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याने आता चर्चांना उत आला आहे. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, शरद पवार आणि अजित पवार यांची काका- पुतण्याची भेट ही एक सामान्य भेट असू शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी ते शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले असतील असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत. Maharashtra Politics

Published on: Aug 13, 2023 07:45 AM