मतदार संघात राहील्या तर सुप्रिया सुळे कमी फरकाने हरतील, सुधीर मुनगंटीवार यांची खोचक टीका
संजय राऊत यांनी राहुल गांधी पंतप्रधान होण्यास योग्य उमेदवार असल्याचे वक्तव्य केल्याने त्यावर भाजपा नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत बाळासाहेबांचे विचार विसरून कॉंग्रेसच्या वळचणीला गेले आहेत. ज्या कॉंग्रेसने रामायण काल्पनिक असल्याचे म्हटले होते अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. सुप्रिया सुळे जरी दहा महिने मतदार संघात राहील्या तरी त्यांचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सांगली | 29 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आता दहा महिने मतदार संघातच तळ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करून लोकसभा मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावर आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अशी टीका करीत जर मतदार संघात गडबड झाली तर देशाचं नेतृत्व करणार ? असा मिश्कील सवाल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी तळ ठोकला तर त्या कमी फरकाने हरतील असा दावाही त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्याकडून चांगले बोलण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. ते आता कॉंग्रेसच्या साथीने गेले आहेत. ज्या कॉंग्रेसने रामायण काल्पनिक असल्याचे म्हटले होते असे मुनगुंटीवार यांनी सांगितले. राज्यातील 36 जिल्ह्यात 75 सोलर सिनेनाट्य मंदिर उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी त्यांच्या भाषणांनी उलट लोकांना भाजपाला मतदान करण्यास प्रवृत्त करतात असेही त्यांनी म्हटले आहे.