कोण विनायक राऊत? काय त्यांची औकात?; नारायण राणे यांनी उडवली ‘त्या’ खासदाराच्या उपोषणाची खिल्ली
VIDEO | शरद पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन काही होणार नाही. आता आम्ही सर्वपक्षीयांचं सरकार बनवतोय. यामध्ये काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार आहेत, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काय केला नेमका दावा?
नवी दिल्ली, १५ ऑगस्ट २०२३ | शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत हे कोकणातील प्रश्नावर उपोषण करत आहेत. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्या उपोषणाची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले. नारायण राणे म्हणाले, ‘कोण विनायक राऊत ?, काय आहे त्यांची औकात ? गेल्या 10 वर्षात त्यांनी जनतेसाठी काही योजना आणली का?’ असा सवाल करत उपोषण काय करता त्यांना हवी असेल तर मी बिर्याणी पाठवतो असे म्हणत नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्या उपोषणाची खिल्लीच उडवल्याचे पाहायला मिळत आहे. तर नारायण राणे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी इंडिया आघाडीत 36 जण एकत्र येऊन काही फायदा नाही. त्यांच्यामुळे भाजपचं काही बिघडलं नाही. मग येथे तिघे एकत्र येऊ द्या किंवा आणखीन कमी अधिक होऊ द्या काही होऊ शकत नाही. आता आम्ही सर्वपक्षीयांचं सरकार बनवतोय. यात काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार आहेत असा दावा राणे यांनी केला आहे.