फार आशावादी राहु नका, मविआत फूट पडणार; भाजप नेत्याचा इशारा
त्यांच्या वज्रमूठीला आता तडा जाईल. तर 2024 च्या निवडणुकीत भाजपचाच विजयी होईल, असे म्हटलं आहे. त्यासोबतच भाजप हा फेविकॉल ब्रँड आहे. त्यामुळे पक्षात अशी बंडखोरी होत नाही
पुणे : सध्या राज्याच्या राजकारणात भाजपच्या (BJP) विरोधात महाविकास आघाडी आणि भाजपच्या सोबतीला शिंदे गट असे चित्र आहे. मात्र अनेक ठिकाणी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) फुट पडताना दिसत आहे. तर भाजप आणि शिंदे गटात प्रवेश होत आहेत. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधताना महाविकास आघाडीत फूट पडणार आहे. त्यांच्या वज्रमूठीला आता तडा जाईल. तर 2024 च्या निवडणुकीत भाजपचाच विजयी होईल, असे म्हटलं आहे. त्यासोबतच भाजप हा फेविकॉल ब्रँड आहे. त्यामुळे पक्षात अशी बंडखोरी होत नाही. त्यामुळे विरोधकांनी जास्त आशावादी होऊ नये. बातम्या या येतात, त्या खोट्याही असू शकतात असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Published on: Apr 14, 2023 07:37 AM
Latest Videos