खडसे – महाजन यांच्यात पुन्हा जुंपली, ‘तुमचं काय राहिलं, तुमची मस्ती लोकांनी…’
खडसे साहेब तुमची मस्ती अजून जिरली नाही का? दहा मंत्री पद घेतली त्यावेळी काही वाटलं नाही का? तुम्ही जे धंदे केले त्याचे फळ आता भोगत आहात? आता का उर बडवत आहात अशी टीका करतानाच मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठं भाष्य केलय.
जालना : 05 सप्टेंबर 2023 | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जालना येथे झालेल्या घटनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावर गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल क्षमा मागितली आहे. माफी मागायलाही मोठेपणा लागतो असे महाजन म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कायदेशीर लोकांशी चर्चा केली आहे. तांत्रिकदृष्ट्या सगळ्या बाबींची पूर्तता करावी लागेल. अध्यादेश असा निघत नसतो. अध्यादेश काढून कॅबिनेटने निर्णय घेतला असा विषय होत नाही. उद्धवजींच सरकार आलं आणि त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण खारीज झालं. मराठा समाजाच्या मागणीला हेच सरकार न्याय देईल असेही ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. आम्ही त्यांची समजूत नक्की काढू. त्यांची तब्येत खालावत चालली आहे. त्यांना जास्त दिवस आंदोलनाला बसू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.