जळगावात भाकरी फिरताच पक्षातून बडतर्फ केलेल्या नेत्यानं दिलं थेट चॅलेज? म्हणाला, ‘दूध का दूध, पाणी का पाणी’…
जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मी भाजप शिंदे गटाला मतदान केलं नाही तर त्यांनी मला केलं आहे. त्यामुळे पक्षविरोधी असं मी काही केलेलं नाही.
जळगाव : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातीत आणि पक्षनिरोधी कृत्य केल्याने येथील एका राष्ट्रवादीच्या नेत्याची पक्षाने हाकालपट्टी करण्यात आली. वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मी भाजप शिंदे गटाला मतदान केलं नाही तर त्यांनी मला केलं आहे. त्यामुळे पक्षविरोधी असं मी काही केलेलं नाही. तर मी काही नाराज नाही. उलट मी याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करणार. तसेच आपण मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर जिल्ह्यातील भाकरी आता फिरवायलाच हवी. माझ्या बाबत काही असेल तर समोर बसा मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असेही ते म्हणाले. मग कारवाई करावी असं आवाहन त्यांनी दिलं आहे.