राष्ट्रवादीच्या नेत्याला जाहीरातबाजी भोवली? थेट पक्षातूनच केलं पक्षातून बडतर्फ? कोण आहे हा नेता?

राष्ट्रवादीच्या नेत्याला जाहीरातबाजी भोवली? थेट पक्षातूनच केलं पक्षातून बडतर्फ? कोण आहे हा नेता?

| Updated on: May 18, 2023 | 8:00 AM

दरम्यान राष्ट्रवादी भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच जळगावात मात्र राष्ट्रवादीच्या त्या नेत्याची पक्षाने हाकालपट्टी केल्याची बातमी धडकली. त्यामुळे जळगावात उलटसुट चर्चा रंगली आहे.

जळगाव : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रात जाहीरातबाजी केली. मात्र महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत चक्क राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो छापण्यात आल्यानं राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी भाकरी फिरवणार अशी चर्चा सुरू झाली असतानाच जळगावात मात्र राष्ट्रवादीच्या त्या नेत्याची पक्षाने हाकालपट्टी केल्याची बातमी धडकली. त्यामुळे जळगावात उलटसुट चर्चा रंगली आहे. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतचे पत्र काढले आहे. तर जळगाव जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाची निवडीनंतर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

Published on: May 18, 2023 08:00 AM