Radhakrishna Vikhe Patil | महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय

Radhakrishna Vikhe Patil | महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय

| Updated on: Jan 02, 2023 | 8:48 PM

अजित पवार यांनी ज्याप्रकारे छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. त्यांनी राज्याची माफी मागायलाच हवी.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात ठिकठिकानी आंदोलने करण्यात येत आहे. भाजपकडून ही राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्याचबरोबर अहमदनगरमध्ये देखिल भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विखे-पाटील यांनी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय असं म्हटलं आहे.

यावेळी विखे-पाटील यांनी, अजित पवार यांनी ज्याप्रकारे छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं सांगितलं. तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आम्हाला अजित पवार यांच्याकडून सर्टीफिकेटची आवश्यकता नाही. ही पदवी जनतेनं त्यांना दिली.

तसेच या मविआमध्ये अनेक पोपट झाले आहेत. जे रोज सकाळी भविष्य वर्तवतात. मात्र शिंदे आणि फडणवीस यांनी या नेत्यांचे गृह निश्चत केलं आहे. त्यामुळे यांच्यात कुंडल्या सरकारच्या हातात आहेत. सरकार हे मजबूत आहे. त्यामुळे अशी वक्तव्य करून सरकार नाही तर हेच अडचणीत येतील.

Published on: Jan 02, 2023 08:48 PM