पडळकरांच्या वक्तव्यावर मिटकरींची टीका म्हणाले, हा गोप्या म्हणजे...

पडळकरांच्या वक्तव्यावर मिटकरींची टीका म्हणाले, हा गोप्या म्हणजे…

| Updated on: Mar 27, 2023 | 2:29 PM

मिटकरी यांनी शरद पवार यांचं नुसतं नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा, अशी टीका केली आहे. मिटकरी यांनी ट्विट करून गोपीचंद पडळकर यांच्या त्या विधानाचा समाचार घेताना

अकोला : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच वादात सापडणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. इंदापुरमधील सभेत शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल, वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. पडळकर यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी यांनी, गोपीचंद पडळकरांना थेट चुलीवरचा बाबा असं म्हटलं आहे.

मिटकरी यांनी शरद पवार यांचं नुसतं नाव ऐकलं तरी गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणून समजा, अशी टीका केली आहे. मिटकरी यांनी ट्विट करून गोपीचंद पडळकर यांच्या त्या विधानाचा समाचार घेताना, याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही. हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, अशीही खोचक केली आहे.

Published on: Mar 27, 2023 02:29 PM