Jaykumar Gore | सरकार अधिवेशनापासून पळ काढतंय, भाजप आमदार जयकुमार गोरे यांची टीका

| Updated on: Jun 22, 2021 | 8:16 PM

सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. सरकारची निर्मिती मुळात विश्वासघाताने झालीय, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे. (BJP mla jaykumar gore target on government about session)

पुणे : सरकार स्थापन झाल्यापासून अधिवेशनापासून पळ काढतंय. सरकारला आपल्याच सहकारी पक्षावर विश्वास नाही, सरकारला धोका वाटतोय. अध्यक्ष निवडणुकीमध्ये सरकार टिकेल का ? हा विश्वास नाही. अध्यक्ष निवडणुकीत सरकार पडेल अशी तिन्ही पक्षांना भीती वाटते. प्रताप सरनाईकांसारखे मत असणारे अनेक आमदार आहेत, जे आमच्याकडे खाजगीमध्ये बोलतायत. सरकारमधील अनेक आमदार नाराज आहेत. सरकारची निर्मिती मुळात विश्वासघाताने झालीय, अशी टीका भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केली आहे.