नितेश राणे यांनी केली संजय राऊत यांची तिकीट बुक, 'जायची तिकीट आहे पण...'

नितेश राणे यांनी केली संजय राऊत यांची तिकीट बुक, ‘जायची तिकीट आहे पण…’

| Updated on: Sep 17, 2023 | 8:49 PM

शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो मान्य असेल. निवडणुक आयोगाने यापुर्वीच शिवसेनेबाबत आपली भुमिका मांडली आहे. उबाठा गटाचे त्याने समाधान होत नसेल तर त्यांनी ते करून घ्यायला हवं. उद्या संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. त्यात जे काही नवे कायदे होतील ते देशहितासाठी असतील.

मुंबई : 17 सप्टेंबर 2023 | गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी २५० बसेस सोडल्या आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित त्यांनी दादर येथून विशेष मोदी एक्स्प्रेस सोडली. या गाडीतील प्रवाशांची त्यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी गणेशोत्सव आमच्या भक्तीचा, मायेचा विषय आहे. यात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या चुका पोटात घालून घ्याव असे आवाहन केले. विरोधक हे नेहमीच टीका करत असतात. गणपतीच्या काळात आम्ही या सेवा देत आहोत. नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनी कधी ट्रेन सोडली नाही. आदित्य ठाकरे याला मला सांगायंचय की टिका करू नकोस. हिम्मत असेल तर फक्त ८ रेल्वे गाड्या कोकणवासीयांसाठी सोडून दाखव. विरोधकांना काम धंदे काय? असा टोला त्यांनी लगावला. आमदार बच्चू कडू पत्रकारांशी बोलण्यापेक्षा खिशात ठेवलेला फोन काढा आणि राज्याच्या मुख्य नेत्यांशी बोला. जरा कडू बोलणं सोडून द्या, असा टोला लगावला. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘तुम्हाला गावी जायचं असेल तर जा आम्ही ट्रेन बूक केलीय. तीन सीट रिकामी ठेवल्या आहेत. तुम्हाला जायची तिकीट आहे पण यायची नाही.’ असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Published on: Sep 17, 2023 08:48 PM