‘त्यांचं, नाचता येईना अंगण वाकडं असं झालंय’; कोणी केलीय संजय राऊत यांच्यावर टीका
तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुंबई कमजोर करण्यासाठी शेट मंडळ हे नेहमीच पडद्यामागून काम करतयं. तर आता राज्याचे राज्यपाल कुठे आहेत? मविआचं सरकार होतं तेंव्हा त्यांचे अस्तित्व होतं.
मुंबई, 8 ऑगस्ट 2023 । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आणि राज्यपाल यांच्या भूमिवेवर जोरदार टीका केली. तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुंबई कमजोर करण्यासाठी शेट मंडळ हे नेहमीच पडद्यामागून काम करतयं. तर आता राज्याचे राज्यपाल कुठे आहेत? मविआचं सरकार होतं तेंव्हा त्यांचे अस्तित्व होतं. आता राज्यपाल कुठे आहेत असा सवाल केला होता. त्यावर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी राऊत यांच्यावर घणघाती टीका केलीय. राज्यपाल हे घटनात्मक पद असून आता त्यांच्यावरती राऊत टीका करू लागले आहेत. मला वाटते त्यांची राजकीय अपरिपक्वता नाही. तर राऊतांचे नाचता येईना अंगण वाकडं असं झालंय. त्यांच्याकडे बोलायला काय मुद्दे राहिले नाहीत. सरकार चांगलं काम करतय त्यामुळे त्यांची गोची झालीय असा टोला लगावला आहे. तर केंद्रीय नेतृत्वावर टीका करण्याची राऊत यांची लायकी नाही. तर सामना पेपर हा वाचल्यानंतर कोण मच्छी बाजारामध्ये बांधायला, फ्रुट बाजारमध्ये, भाजी बांधायला वापरतात अशीही टीका केलीय.