विद्यापीठ कुलगुरू यांच्यावर भाजप आमदार संतापला; केबिनमध्येच ठिय्या आंदोलन
भाजप आमदारानेच कुलगुरूंच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केल्यानं एकच चर्चा सुरू आहे. तर असं काय झालं ज्यामुळे आमदारालाच आंदोलन करण्याची गरज पडली असा सवाल आता नागपूर येथे अनेकांना पडला आहे.
नागपूर : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तर भाजप आमदारानेच कुलगुरूंच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केल्यानं एकच चर्चा सुरू आहे. तर असं काय झालं ज्यामुळे आमदारालाच आंदोलन करण्याची गरज पडली असा सवाल आता नागपूर येथे अनेकांना पडला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठाने सफाईसाठी एकग कंपनी निवडली आहे. त्यांच्याकडून येथे 36 सफाई कामगारांना नियुक्ती देण्यात आली होती. मात्र कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकलं. त्यावरून भाजप आमदार प्रवीण दाटके माजी महापौर संदीप जोशी यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे विचारणा केली. यावेळी तेथे 36 कामगारही उपस्थित होते. त्यानंतर योग्य उत्तर मिळत नसल्याने आमदार दाटके व माजी महापौर जोशी यांनी कुलगुरूंच्या केबिनमध्येच आंदोलन सुरू केले. याची माहिती शहरभर पसरली तसेच चर्चा सुरू झाल्याने भाजप नेत्यांनी तोडगा काढण्याच्या सुचना कुलगुरूंना आणि आंदोनक नेत्यांना केल्या. त्यानंतर कुलगुरूंसोबत चर्चेनंतर यावर तोगडा निघाला आणि हे आंदोलन मिटलं. यावेळी एक जुलैपासून या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीच्या माध्यमातून कामावर रुजू करून घेतलं जाईल. त्यांचे नियमित वेतन सुद्धा दिला जाणार असं आश्वासन कुलगुरूंकडून देण्यात आल. त्यानंतर भाजपने आंदोलन मागे घेतल. मात्र 1 जुलैपर्यंत यावर निर्णय नाही झाला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.