हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; प्रवीण दरेकर यांचा अजितदादांना नाव न घेता सवाल

| Updated on: Sep 20, 2024 | 4:18 PM

भाजपा नेते नितेश राणे यांच्या सांगलीतील वादग्रस्त वक्तव्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी नितेश राणेंची भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे. यावर प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?

Follow us on

वाचवीरांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. कारण वाचाळवीरांच्या वक्तव्याचा फटका हा महायुतीला होत आहे, असं अजित पवार म्हणाले होते. सांगलीतून नितेश राणेंनी भडकावू भाषण केलं होते. एक दिवस पोलिसांना सुट्टी देतो. मुस्लिमांनी ताकद दाखवावी. मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुसलमान अशी चिथावणी नितेश राणेंनी दिली होती. यानंतर अजित दादा गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा सर्वाधिक आक्षेप आहे. त्यावरुनच अजित दादांनी आता दिल्लीतल्या भाजपच्याच हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. यासंदर्भात भाजप आमदार प्रवीण दरेकरांना सवाल केला असता त्यांनी अजित पवार यांनाच नाव न घेता सवाल केला आहे. ‘अजित दादा नाराज आहेत की नाही माहिती नाही, प्रत्येकाला पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करण्याचा अधिकार आहेत. पण असं काही झालंय असं मला वाटत नाही.’, असे प्रवीण दरेकर म्हणाले. तर राज्यातील महायुतीतील तिनही पक्षांचे नेतृत्व सक्षम आहे. कोणी असे बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये. पण जर कोणी हिंदुत्वासाठी आपली भूमिका घेत असेल तर त्याला वाचाळविर म्हणणं योग्य नाही, असे म्हणत प्रवीण दरेकरांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.