Ram Satpute | फडणवीसांच्या सभेला जात असताना अपघात, राम सातपुतेंच्या गाडीचा अपघात

Ram Satpute | फडणवीसांच्या सभेला जात असताना अपघात, राम सातपुतेंच्या गाडीचा अपघात

| Updated on: May 20, 2022 | 9:30 PM

भाजप आमदार राम सातपुते याच्या गाडीला माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या अपघातातून राम सातपुते व सोबत असलेले सहकारी बचावले आहेत.

पुणे : अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला अपघात झालेल्याची घटना ताजी असतानाच, आता माळशिरसमधील भाजप आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute)यांच्या गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राम सातपुते यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर(Twitter) हॅन्डलवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘अकाल मृत्यु वो मरे जो काम करे चांडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का आज माझ्या गाडीला अपघात झाला पण मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी व माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. काळजी करु नका ‘असे ट्विट त्यांनी केले आहे. अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. अपघाताची (Accident) घटना घडल्यानंतर राम सातपुते यांनी आपल्या फेसबुक व ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. याबरोबरच माझ्या मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: May 20, 2022 09:30 PM