‘आका’ या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस ?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली, त्यानंतर या प्रकरणात राज्यभरात आंदोलन सुरु झाले होते. या प्रकरणात २२ दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झालेले आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयात स्वत:हून हजर झाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याने २२ दिवसानंतर पुणे सीआयडी कार्यालयात अखेर मंगळवारी शरणागती पत्करली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याने शरण येण्यापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत वाल्मिक कराड याने आपण निर्दोष असून आपल्याला राजकीय द्वेषातून या खंडणीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा आरोप कराड याने केला आहे. या संदर्भात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी कशाचे राजकारण आणि काय..आम्ही राजकर्त्यांनी सांगितले होते की अशा प्रकारे संतोष देशमुख यांची अशा प्रकारे हाल करुन हत्या करा म्हणून.. स्वत:च्या अंगावर आले म्हणून ते आता आरोप करीत आहेत. अशीच घटना ऑक्टोबर २०२३ मध्ये घडली होती. अशीच घटना माझ्या मतदार संघात पाटोदा तालुक्यात घडली होती. ओटू कंपनीच्या बंडगर नावाच्या अधिकाऱ्याला उचलून आणले होते. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खंडणी मागितली होती.नंतर त्याला सोडले होते. अशा प्रकारच्या धमक्या पचल्याने दोन कोटीची खंडणी मागितली होती. पन्नास लाख मिळाले होते. राहिलेल्या दीड कोटी मागण्यासाठी माणसे आकानेच पाठविली होती. त्यामुळे ‘आका’ या गुन्ह्यातून बाहेर राहतील असे मला वाटत नाही असेही सुरेश धस यांनी सांगितले.