99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर विरोधक एकवटले असून येत्या शनिवार 28 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. या प्रकरणात विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टीका करीत धनंजय मुंडे आणि अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड केंद्र स्थानी आले आहे.या प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी बीडमधील अर्बन नक्षलवादी यांचा संबंध भाजपा आणि आरएसएसशी आहे का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बीडमधील हत्येचा सूत्रधार हा मंत्रिमंडळात आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांचा आणि अजित पवार यांचाही राजीनामा घ्या असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.बीडमधील हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रीमंडळात आहे. देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहीजे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांची प्रकरणे लावून धरली नसती तर गृहखात्याने हे दोन खून पचवून ढेकर दिले असते असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर गुन्हेगारांना फाशी द्या, माझ्या जवळचा असला तरी परंतू काही जण राजकारणासाठी टीका करीत आहेत असा पलटवार मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.तर या लोकांनी 99 अपराध यांनी याआधी पचवले आहे, संतोष देशमुख 100 वा होता अशी टीका भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.