'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?

‘बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,’ काय म्हणाले सुरेश धस?

| Updated on: Dec 30, 2024 | 4:23 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपींना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही.या प्रकरणात भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी विधीमंडळ आवाज उठवलेला आहे. आता या प्रकरणात सोमवारी सुरेश धस बीड जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर सूत्रधारांना अटक करण्याची मागणी करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांची आज भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणाचा जो काही तपास सुरु आहे त्यावरुन आपण समाधानी आहे असे सुरेश धस यांनी सांगितले. मी आधीच सांगितले की,बकरी की माँ कब तक दुवा मागेगी दुआँ फार काळ चालत नसती दुवा अर्ध्यातच सुटणार आहे. मला असे वाटक आका आणि त्यांचे आका यांच्यात द्वंद चालल्यावाणी दिसत आहे. हजर व्हावे की नाही…व्हावे की नाही असेही ते म्हणाले. वाळूवाले बंद झाले. राखवाले बंद झाले आहेत. आता दाऊदपूर नावाचे गाव आहे. तेथे दीपक मुंडे, अजय मुंडे, अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत कोणाचे ते तुम्ही शोधा.सायस मुंडे,गणेश मुंडे, समाधान बिडगर,मुन्ना जयस्वाल, दत्ता कराड ही सगळी सगळी मंडळी दाऊदपूर गावातील हजारो टिप्पर चालवून राख उपसून उघड्यावर नेतात. दीडशे दीडशे गुंड घेऊन येतात. रात्रीच्या वेळी ही राख हवेत उडते.परळीच्या शेजारच्या गावातील लहान लहान मुलांना दमा झालेला आहे असे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. हे खाते आता आमच्याकडेच आले आहे. त्यांना मी कारवाई करायला सांगणार असल्याचेही धस यावेळी म्हणाले.

Published on: Dec 30, 2024 03:32 PM