दाऊद शरण सरकारचे भाषण का ऐकायचं? – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे.
महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिनेशन (Budget Session) आजपासून सुरू झालं आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरलं आहे. भाजपानं आक्रमक भूमिका घेतली असून नवाब मलिक हाय हायच्या घोषणा तर भाजपानं दिल्याच. त्याचबरोबर जुते मारो सालों को, अशी आक्षेपार्ह घोषणाबाजीही भाजपाच्या आमदारांनी केलीय. दाऊदसोबत व्यवहार केल्याचा नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे. हसीना पारकरला पैसे दिल्याचे भाजपाचं म्हणणं आहे. मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्यातील आरोपींसोबत व्यवहार करून आणि हसीना पारकरला पैसे देऊन ज्याप्रकारे हे काम झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलीय, अशी अटक झालेली असताना एखादा मंत्री मंत्रीपदावर राहतो, हे नैतिकतेला धरून नाही, असे भाजपाचे म्हणणे आहे.
Published on: Mar 03, 2022 12:56 PM
Latest Videos