सर्जरीवरून सुषमा अंधारेंवर शिवसेना नेत्याचा पलटवार; म्हणाल्या, उलट तुम्ही...

सर्जरीवरून सुषमा अंधारेंवर शिवसेना नेत्याचा पलटवार; म्हणाल्या, उलट तुम्ही…

| Updated on: Apr 08, 2023 | 7:26 AM

सुषमाताई यांची बोलण्याची स्टाईल वेगळी आहे. आधी राष्ट्रवादीतून अशाच पद्धतीने शिवसेनेवर बोलायच्या आता त्या इकडे येऊन वेगवेगळ्या अॅक्टिंग करून त्या बोलतात

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची राखी सावंत यांच्यासोबत तुलना केली होती. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंतची थेट अमृता फडणवीस यांच्यासोबत तुलना केली. त्यावरून आता टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. सुषमाताई यांची बोलण्याची स्टाईल वेगळी आहे. आधी राष्ट्रवादीतून अशाच पद्धतीने शिवसेनेवर बोलायच्या आता त्या इकडे येऊन वेगवेगळ्या अॅक्टिंग करून त्या बोलतात. अमृता फडणवीस आणि राखी सावंत या ग्लॅमर्स वर्ल्डमध्ये काम करतात. त्यांना तेथे राहण्यासाठी काम करण्यासाठी तसं करावं लागतं. सर्जरी करण्यासाठी खूप पैसा लागतो. ग्लॅमर्स वर्ल्डमध्ये स्वतःला नीट ठेवणं, साजेस राहणं, टीव्हीवर छान दिसणं हे महत्त्वाचं आहे. सुषमाताई तुम्ही उलट महिलांना सपोर्ट करायला पाहिजे. तो प्रत्येक स्त्री तिला अधिकार आहे. जर तुम्हीच त्यांच्याबद्दल बोलणार तर कसं चालणार? मला असं वाटत, सुषमाताईंनी पण असं काहीतरी छान पैकी करून छान प्रेझेंट झाला पाहिजे.

Published on: Apr 08, 2023 07:26 AM