Rohit Pawar On Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही – tv9
रोहित पवार म्हणाले, कोण कोणाविरोधात टीका करत हे महत्वाचं नाही. आणि कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही. कारण त्यांच्या टीकेत कुठचं सामान्य लोकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न दिसलेले नाहीत.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवरून सध्या राजकारण तापलेलं दिसत आहे. कंबोज यांनी केलेल्या टीकेला उत्तर आता आमदार रोहित पवार यांनी दिले आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, कोण कोणाविरोधात टीका करत हे महत्वाचं नाही. आणि कंबोज यांच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं नाही. कारण त्यांच्या टीकेत कुठचं सामान्य लोकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, या महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न दिसलेले नाहीत. तसेच मोहित कंबोज महाराष्ट्रात कधी आले हे देखिल आपल्याला माहित नाही. पण सध्या राज्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. ही असली टीका व्यक्तिगत असते त्याला दुर्लक्ष करणंच गरजेच असल्याचे ही रोहित पवार म्हणाले.
Published on: Aug 23, 2022 02:04 PM
Latest Videos