संभाजी भिडे वाद चिघळला? यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपचे अनिल बोंडे धारकऱ्यांबरोबर, म्हणाले….

| Updated on: Jul 30, 2023 | 4:35 PM

VIDEO | यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अनिल बोंडे पोलीस ठाण्यात; अनिल बोंडे यांनी काय केली मागणी?

अमरावती, ३० जुलै २०२३ | महात्मा गांधी यांच्या विरोधात बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही, असे म्हणत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे हे अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्यात पोहचले. यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे विरोधात अपशब्द वापरले. त्यामुळे अनिल बोंडे आक्रमक झालेत. शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसोबत अनिल बोंडे हे अमरावतीच्या पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी यशोमती ठाकूर यांच्या विरोधात तक्रार देत अनिल बोंडे यांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, ‘संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात काँग्रेसने काल आंदोलन केलं. त्यावेळी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी न शोभणारे वक्तव्य केलं. भिडे गुरुजी यांना या हरामखोराला लाता मारून हाकललं पाहिजे. नालायक अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी शिव्या दिल्या. संतांसमान असणाऱ्या भिडे गुरुजी यांना मानणारे सगळ्या लोकांच्या भावना दुखावल्या.’, असेही अनिल बोंडे यांनी म्हटले.

Published on: Jul 30, 2023 04:00 PM
‘आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे का नव्हते?’ संजय शिरसाट यांचा सवाल
आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे उपस्थित होते की नव्हते? केदार दिघे यांनी स्पष्टच सांगितलं…