'त्या' वक्तव्यावर भाजप खासदाराचा उद्धव ठाकरे यांना सवाल? म्हणाला, 'राऊत यांना कशासाठी पोसताय?'

‘त्या’ वक्तव्यावर भाजप खासदाराचा उद्धव ठाकरे यांना सवाल? म्हणाला, ‘राऊत यांना कशासाठी पोसताय?’

| Updated on: Jun 04, 2023 | 12:46 PM

दिल्लीत गुजरातचे दोन दाढीवाले तर राज्यात एक दाढीवाला असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला होता. तसेच दाढी असली म्हणजे अक्कल असतेच अने नाही असे म्हणत सडकून टीका केली होती.

नांदेड : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सह शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांनी दिल्लीत गुजरातचे दोन दाढीवाले तर राज्यात एक दाढीवाला असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला होता. तसेच दाढी असली म्हणजे अक्कल असतेच अने नाही असे म्हणत सडकून टीका केली होती. त्यावरून आता भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. यामुद्द्यावरून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले असून उद्धव ठाकरे त्यांना कसे काय पोसतात असा सवाल चिखलीकर यांनी उपस्थित केलाय.

Published on: Jun 04, 2023 12:46 PM