भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक

| Updated on: Feb 28, 2024 | 1:27 PM

खासदार प्रतापराव चिखलीकर यांची बहिण आशा शिंदे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे प्रतापराव चिखलीकरांचा पत्ता कट होणार का? अशीही चर्चा सुरू होती. आता प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिण आशा शिंदे कॉंग्रेसमधून लोकसभा लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Follow us on

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. इतकंच नाहीतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची खासदारकीही देण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक जण भाजपमध्ये यणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अशातच खासदार प्रतापराव चिखलीकर यांची बहिण आशा शिंदे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे प्रतापराव चिखलीकरांचा पत्ता कट होणार का? अशीही चर्चा सुरू होती. भाजपने अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांनी उमेदवारी सांगितली आहे. तर आता प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिण आशा शिंदे कॉंग्रेसमधून लोकसभा लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या आशा शिंदे या पत्नी आहेत. तर प्रतापराव चिखलीकर यांच्या बहिण आहेत. यातच आज आशा शिंदे नाना पटोले यांची भेट घेणार असून चर्चा करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.