संजय राऊत यांच्यावर काय बोलायचं आता बोलून थकलोय! भाजपच्या नेत्याची टीका
अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आता काय काय बोलायचं अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संजय राऊत यांना राज्यात खासदारक असतात? किती मतदार संघ आहेत हे देखिल माहित नसणार असेही ते म्हणाले.
अहमदनगर : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ते निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाचीच असा निकाल देईपर्यंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भाजप आणि शिंदे गटावर टीका करत आलेले आहेत. तसेच ते आम्ही सेनेचे इतके आमदार तितके खासदार निवडणून आणू असे प्रतिक्रिया देत असतात. त्यावर अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आता काय काय बोलायचं अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संजय राऊत यांना राज्यात खासदारक असतात? किती मतदार संघ आहेत हे देखिल माहित नसणार असेही ते म्हणाले. त्याचबरोबर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला तेथे महाविकास आघाडीत एकी दिसली नाही. हे असच पुढे होणार. चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल हा फक्त ट्रेलर, आगामी निवडणुकांमध्ये चित्र स्पष्ट होईल असेही विखे पाटील म्हणाले.
Published on: Mar 06, 2023 04:44 PM
Latest Videos