उद्धव ठाकरेंना घरात ठेवून, काँग्रेसला गाफील ठेवून जयंत पाटलांना राष्ट्रवादीला मोठं करायचं होतं, उन्मेश पाटील यांचे गंभीर आरोप

“उद्धव ठाकरेंना घरात ठेवून, काँग्रेसला गाफील ठेवून जयंत पाटलांना राष्ट्रवादीला मोठं करायचं होतं”, उन्मेश पाटील यांचे गंभीर आरोप

| Updated on: Aug 28, 2022 | 9:04 AM

(Jayant Patil: भाजपचे चाळीसगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

भाजपचे चाळीसगावचे खासदार उन्मेश पाटील (BJP MP Unmesh Patil) यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरात ठेवून आणि काँग्रेसला गाफील ठेवून त्यांना राष्ट्रवादी पक्षाला मोठं करायचं होतं, असं उन्मेश पाटील म्हणाले आहेत. शिवाय अडीच वर्ष मुख्यमंत्री घरात असताना जयंत पाटलांच्या तोंडून शब्द निघाला नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करत आहेत. लोकांची कामं करत आहेत तर जयंत पाटील त्यांच्यावर टीका करत आहेत, हे योग्य नाही. शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल, असं उन्मेश पाटील म्हणालेत.

Published on: Aug 28, 2022 09:04 AM